चोडणेकर कुटुंबीयांची आमदार नाईक यांनी घेतली भेट…

तळाशील येथील होडी दुर्घटना ; कुटुंबाचे केले सांत्वन…

मालवण, तळाशील येथे खाडीपात्रात काही दिवसांपूर्वी होडी उलटल्याने पाण्यात बुडून झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय- ५५) या मच्छीमाराचा अद्यापही शोध लागलेला नाही. या दुर्घटनेची माहिती मिळताच मालवण दौऱ्यावर आलेल्या आमदार वैभव नाईक यांनी पदाधिकाऱ्यांसह चोडणेकर कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. तळाशील खाडीपात्रात मासेमारीसाठी गेले असताना मुसळधार पाऊस व वाऱ्याच्या तडाख्यात मासेमारीची होडी उलटली. यात होडीतील किशोर चोडणेकर, धोंडिराज परब, लावण्य चोडणेकर हे तिघेही पाण्यात फेकले गेले. यात लावण्य हा पोहत किनाऱ्यावर आल्याने बचावला तर चोडणेकर, परब हे दोघे बेपत्ता झाले. यात परब यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी जाळ्यात अडकलेल्या अवस्थेत आढळून आला तर श्री. चोडणेकर हे अद्यापही बेपत्ता आहेत. आज मालवण दौऱ्यावर आलेल्या आमदार वैभव नाईक यांनी तळाशील येथे जात चोडणेकर कुटुंबीयांची भेट घेतली. घडलेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत आमदार नाईक यांनी चोडणेकर कुटुंबियांना धीर दिला. यावेळी त्यांच्या समवेत तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार ओरसकर, यतीन खोत, सरपंच नेहा तोंडवळकर, उपसरपंच हर्षद पाटील, आदित्य पेडणेकर, संजय केळुसकर, सुहास कोचरेकर, रवी कोचरेकर, सिद्धेश मांजरेकर, जयदेव लोणे, संजय जुवाटकर, हर्षद चोडणेकर, जयहरी कोचरेकर, किर्तिराज चोडणकर, निखिल पेडणेकर आदी उपस्थित होते

🚨 अत्यंत तातडीची विनंती – आमची झेना हरवली आहे 🚨
आमची लाडकी पाळीव कुत्री “झेना” (पॉमेरियन जात) दिनांक 7 फेब्रुवारीच्या रात्रीपासून हरवली आहे. ती आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे.
🐶 नाव: झेना
🐾 जात: पॉमेरियन
🎨 रंग: तांबूस/तांबड्या रंगाचे केस
📏 उंची: सुमारे 1 फूट
🎂 वय: 2 वर्षे
ती कोणाला दिसल्यास, सापडल्यास किंवा तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास कृपया त्वरित संपर्क साधावा.
झेनाला सुरक्षित परत आणून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल.
📍 पत्ता: धुरीवाडा, मालवण
(तोंडवळकरांच्या चक्कीच्या बाजूचे घर)
📞 संपर्क: 7506829118
— कौस्तुभ चंद्रकांत फोंडबा
🙏 कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. तुमची एक शेअर आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद.
error: Content is protected !!