राणें 50014 मताधिक्य घेत झाले विजयी..

नारायण राणेंच्या विजयात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मोठा वाटा
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात 50,014 एवढे मताधिक्य घेत नारायण राणे विजयी झाले आहेत. या राणेंच्या विजयासाठी राणे समर्थक आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांना तिकीट जाहीर होण्याच्या आधीपासूनच खा. नारायण राणे यांच्या प्रचाराची सुरुवात केली होती. त्यासाठी त्यांनी देश आणि राज्यपातळीवरील मोठ्या राजकीय नेत्यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात आणले होते. नारायण राणे यांची ही शेवटची निवडणुक म्हणून आणि राणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याने त्यांना भरभरून साथ दिली. या निवडणुकीत राणेंनी आपली राणे स्टाईल ने या लोकसभा निवडणुकीत प्रचार यंत्रणा वापरली त्यामुळे, कुडाळ मतदारसंघातून 27000, पेक्षा जास्त सावंतवाडी मतदारसंघातून 32000, पेक्षा जास्त आणि कणकवली मतदारसंघातून 41.000 पेक्षा जास्त इतके मताधिक्य या तीन मतदारसंघातून राणे यांना मिळाले. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1 लाख पेक्षा अधिक मतदारांनी राणे यांना मतदान केल्याने त्यांचा विजय निश्चित आला. मतदानाच्या सुरुवातीपासूनच राणेंची मतमोजणीत आघाडी होत गेली आणि 50,014 इतका मोठा टप्पा पार करुन विजयाच्या दिशेने आगेकूच केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नारायण राणे यांचे विकास विषयक योगदान मोठे असल्याने आणि दादा म्हणून त्यांची आपुलकी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावागावात आहे. तसेच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपक केसरकर यांचे योगदान मोठे राहिले. या अटीतटीच्या सामन्यात कणकवलीनंतर सावंतवाडी तालुक्याने राणे यांना मोठी साथ दिली. शिवसेना पक्षाची विभागणी झाल्यानंतर ही निवडणुक असल्याने कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसैनिकांनी शिवसेनेची साथ सोडल्याची दिसत आहे. आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ असल्याने हे सर्व जुळून आले आहे. अन्यथा राणे यांचा विजय अनिश्चित होता, असे राजकीय तज्ञांचे मत आहे. कारण विनायक राऊत यांना साथ देणारे शिवसेनेचे मोठे नेते निवडणुकीत समोर आलेच नाहीत. त्यांनीच राऊत यांचा पराजय केला, असेही म्हटले जात आहे. शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांनी फक्त अपेक्षा केली पण प्रत्यक्षात ते मतदारांपर्यंत ते पोहचलेच नाहीत. फक्त उमेदवार विनायक राऊत हेच वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहचले. नारायण राणे हे मात्र ग्रामीण भागात पोहचले नाहीत पण राणे पॅटर्न म्हणून एका विशिष्ट लॉबीने त्यांचे काम समाजाभिमुख केले. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचेही कौतुक करायला हवे कारण त्यांनी या निवडणुकीत सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी केली





