एसएससी परीक्षेत कुडाळ हायस्कूलचा निकाल १०० टक्के

परीस प्रसाद कुबल ९८.६० % गुण मिळवून प्रथम

संस्कृत मध्ये १० विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण

प्रतिनिधी । कुडाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत क.म.शि.प्र. मंडळ संचालित कुडाळ हायस्कुल कुडाळ प्रशालेच्या निकाल १०० टक्के लागला आहे. परीस प्रसाद कुबल हा विद्यार्थी ९८.६० टक्के गुण मिळवून प्रशालेतून पहिला आला आहे. संस्कृत मध्ये १० विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत.
मार्च २०२४ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेला कुडाळ हायस्कुल, कुडाळ मधून १८७ विद्यार्थी बसले होते. ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेच्या निकाल १०० टक्के लागला आहे. परीस प्रसाद कुबल ९८.६० टक्के गुण मिळवून प्रथम, आर्या संतोष चिपकर ९६ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर अंकिता अविनाश घाटगे ९५.२० टक्के गुण मिळवून तिसरी आली आहे. दहा विद्यार्थ्यंना संस्कृत मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. विशेष प्राविण्य म्हणजे ७५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १०५, प्रथम श्रेणी (६० % ते ७४ %) विद्यार्थी ५६ तर ६० टक्के पेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २६ आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थाचालक, मुख्याध्यपक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!