श्री विजय चंद्रकांत ठाकूर यांना आदर्श मराठी शिक्षक पुरस्कार.

महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.लांडगे सर यांच्या सन्मानाचे वितरण.

मालवण : विद्यार्थ्यांच्या मातृभाषेतील विविध कौशल्य वृद्धिंगत व्हावी, त्यांची अभिव्यक्ती वाढावी यासाठी राबविलेले विविध मराठी विषयक उपक्रम तसेच वाचन संस्कृतीतील चळवळीसाठी देत असलेले योगदान, इतर शिक्षक कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरावे तसेच मराठी विषयाचा प्रचार प्रसार करण्यासाठी करीत असलेल्या योगदानाचे विशेष कौतुक व्हावे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने “आदर्श मराठी विषय शिक्षक पुरस्कार” श्री विजय चंद्रकांत ठाकर यांना मालवण तालुक्यातून आज प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत देण्यात आला आहे. श्री विजय चंद्रकांत ठाकर हे ज्ञानदीप हायस्कूल हिवाळे तालुका मालवण येथे शिक्षक असून विविध क्षेत्रांमध्ये ते कार्यरत असतात. सामाजिक, सांस्कृतिक,धार्मिक, क्षेत्रामध्ये त्यांचं मोलाचं सहकार्य राहिलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाच्या विविध चळवळींमध्ये सुद्धा विजय ठाकर यांचे मोलाचे सहकार्य असते. आदर्श मराठी विषय शिक्षक पुरस्कार मिळाल्याने श्री विजय चंद्रकांत ठाकर यांचे सर्व स्तरातून कौतुक व गौरव होत आहे.

मयुर ठाकूर / कोकण नाऊ / मालवण

error: Content is protected !!