कुडाळमध्ये मुलांसाठी फुटबॉल आणि व्हॉलीबॉलचे मोफत प्रशिक्षण

दि. १९ मे पासून होणार प्रशिक्षणाची सुरुवात
लाइफस्टाइल मोटिवेटर क्लब कुडाळ यांचा पुढाकार
प्रतिनिधी । कुडाळ : येथील लाइफस्टाइल मोटिवेटर क्लब यांच्यावतीने दि. १९ में पासून १५ दिवस १८ वर्षांखालील मुलांना फुटबॉल आणि हॉलिबॉलचे मोफत विशेष प्रशिक्षण कुडाळ तहसीलदार कार्यालया नजीकच्या क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आले आहे.
फुटबॉल आणि हॉलिबॉल खेळांचा प्रसार प्रचार व्हावा हा या क्लबचा हेतू आहे. त्यातून काही चांगले खेळाडू तयार होत आहेत. वर्षपूर्ती निमित्ताने १५ दिवस चालणाऱ्या या मोफत मोफत प्रशिक्षण शिबिरात १४ वर्षांखालील तसेच १४ ते १८ वयोगटातील मुलांना देण्यात येणार आहे. एफसी (गोवा) सोबत काम करणारे प्रथितयश प्राप्त प्रशिक्षक नयन विरनोडकर प्रशिक्षण देणार आहेत. प्रशिक्षणाला जास्तीत जास्त मुलांनी सहभाशी व्हावे आणि अधिक माहितीसाठी जयंत चमणकर मोबा.8007655852 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लाइफस्टाइल मोटिवेटर क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.





