
संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागाच्या तीन विद्यार्थ्यांची “टाटा वोल्टास प्रायव्हेट लिमिटेड” कंपनीमध्ये निवड.
जयसिंगपूर: शिक्षण क्ष्रेत्रात आपले नाव भारताच्या कानाकोपऱ्यात असलेल्या संजय घोडावत इस्न्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागातील मेकॅनिकल इंजिनीरिंगच्या ३ विद्यार्थ्याची टाटा वोल्टास प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये निवड झाली आहे. या विध्यार्थ्यांना वार्षिक 3.10 लाख पॅकेज मिळाले आहे.
यामध्ये मेकॅनिकल इंजिनीरिंग विभागातून साहिल बारगीर, राजवर्धन बाले, तौसिफ़ लाड यांचा समावेश आहे. दरवर्षी संजय घोडावत इस्न्टिट्यूटच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात. टाटा वोल्टास प्रायव्हेट लिमिटेड एक प्रख्यात कंपनी असून भारतभर तसेच विविध देशात या कंपनीच्या शाखा आहेत. रेफ्रीगेशन अँड कूलिंग क्षेत्रात या कंपनीने आपला नावलौकिक प्राप्त केला आहे.
नैसर्गिक कलचाचणी, तांत्रिक फेरी, एच आर मुलाखत या निकषाच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या निवडीसाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. आशिष पाटील, मेकॅनिकल विभाग समन्वयक प्रा. आकाश घस्ते, श्री. संदीप पिंपळे यांचे सहकार्य लाभले.
या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजयजी घोडावत, विश्वस्त, विनायक भोसले, प्राचार्य, डॉ. विराट व्ही. गिरी, अकॅडमीक डीन, विभागप्रमुख प्रा. प्रशांत पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.