खारेपाटण काझीवाडीत पोलिसांनी घेतली मोहल्ला कमिटी बैठक

तणावग्रस्त वातावरण टाळण्यासाठी स्थानिकांशी केला विचारविनिमय
खारेपाटण या गावी एप्रिल २०२४ या महीन्यामध्ये जमीन जागेच्या कारणावरुन परस्पर विरोधी एकुण सहा गुन्हे कणकवली पोलीस ठाणे येथे दाखल झाले होते.त्यामुळे गावामध्ये तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते.तसेच सध्याची लोकसभा निवडणूकीची पार्श्वभूमी लक्षात घेता.गावामध्ये शांतता पुर्ण वातावरण राहावे. व भविष्यात कोणताही गंभीर गुन्हा घडुन,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये याकरीता दिनांक २/५/२०२४ रोजी कणकवली पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक मा.समशेर तडवी ,यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खारेपाटण काझीवाडी येथे मोहल्ला कमिटीची बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीमध्ये ज्यांचे वर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना नोकरीच्या वेळी होणाऱ्या अडचणी, पोलीस व्हेरिफिकेशन यामध्ये येणाऱ्या अडचणी,पोलीस ठाण्याचे रेकॉर्डवर गावाबाबतचे मत याबाबत कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री समशेर तडवी व खारेपाटण दूरक्षेत्रचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री शरद देठे यांनी मार्गदर्शन करून काझीवाडी ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यांच्या अडचणी बाबत त्यांना कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे बाबत सूचना दिल्या. तसेच गावामध्ये शांतता राखने बाबत आव्हान केले आहे.
सदर बैठकीकरीता पोलीस उपनिरिक्षक श्री शरद देठे ,पोलीस दुरक्षेत्राचे अंमलदार पोलीस नाईक उध्दव साबळे,पोलीस कॉन्स्टेबल पराग मोहीते,किरण मेथे,भूषन सुतार, खारेपाटण ग्रामविकास अधिकारी श्री .वेंगुर्लेकर व काझीवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.यावेळी काझीवाडी मुस्लिम मोहल्ला कमिटीतील नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करत मीटिंग शांततेच्या वातावरणात पार पाडली.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण





