वायंगणी येथे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराला सुरुवात

श्री आदिनाथ मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा करण्यात आला शुभारंभ
महायुतीचे कोकणातील रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा वायंगणी येथे काल दि.30 एप्रिल रोजी शुभारंभ करण्यात आला. वा्यंगणी येथील ग्रामदैवत श्री आदिनाथ मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलं.वा्यंगणी येथे नारायण राणे यांच्या करण्यात आलेल्या प्राचाराच्या वेळी माजी वित्त व बांधकाम सभापती,जि. प सदस्य -बाळा जठार,भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख -सूर्यकांत भालेकर,भाजपा वारियर्स -रमाकांत राऊत,बूथ अध्यक्ष -श्री कृष्ण बाणे,वा्यंगणी उपसरपंच -प्रताप फाटक, संदीप सावंत, प्रमोद जाधव, संदीप दळवी, प्रकाश बाणे, अशोक फाटक, प्रदीप फाटक, प्रकाश गुरव, एकनाथ बाणे, बाबू कदम आदि उपस्थित होते
वा्यंगणी येथे लोकसभेच्या निवडणुकीत खासदारकीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी श्री आदिनाथ मंदिर येथे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने भाजपा चे कार्यकर्ते उपस्थित होते.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण





