शेर्पे येथे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराला आजपासून सुरुवात

काळेश्वरी मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा करण्यात आला शुभारंभ
भारतीय जनता पार्टी शिवसेना,राष्ट्रवादी,आर पी आय व महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीचे कोकणातील रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज सोमवार दी.29एप्रिल २०२४ रोजी सकाळी साडेनऊ वाजता शेर्पे येथील श्री देवी काळेश्वरी मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला. शेर्पे येथे नारायण राणे यांच्या करण्यात आलेल्या प्राचाराच्या वेळी माजी वित्त व बांधकाम सभापती,जि. प सदस्य -बाळा जठार पं. स. सभापती -दिलीप तळेकर ,शाबान मुजावर -बूथ अध्यक्ष, स्मिता पांचाळ- सरपंच, सिराज मुजावर- उपसरपंच ,संतोष ब्रम्हदडे -कुरंगावने सरपंच, बबलु पवार -उपसरपंच कुरंगवने ,बबन शेलार,राजश्री बेलनेकर -ग्रामपंचायत सदस्य,शीतल कांबळे ,मधुकर शेलार ,सुरेश शेलार,,अरुण ब्रम्हादडे,सुभाष शेलार,दिनेश मुद्रस,सुरेश शेलार -मुंबई मंडळ अध्यक्ष,महमद जैतापकर,बाळू पांचाळ, रामा पांचाळ आदि भाजपा चे कार्यकर्ते उपस्थित होते.
शेर्पे येथे आज लोकसभेच्या निवडणुकीत खासदारकीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी श्री काळेश्वरी मंदिर येथे नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने भाजपा चे कार्यकर्ते उपस्थित होते.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण