इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपी महिला विभागातर्फे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन
जागतिक महिला दिनाचे निमित्त
निलेश जोशी | कुडाळ : जागतिक महिला दिनानिमित्त इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपी महिला सेलच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी खालील प्रकारच्या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
मोफत आरोग्य तपासणी शिबीर – दि.26 फेब्रुवारी 2023 रोजी पिंगुळी येथील जिव्हाळा सेवाश्रम येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर. वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत
पोस्टर मेकिंग स्पर्धा –
दिनांक 6 मार्च 2023 रोजी सर्वांसाठी खुल्या पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्थळ बॅ.नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ, वेळ सकाळी दहा ते बारा
होळी महोत्सव –
दि ८मार्च रोजी होळी महोत्सवा निमित्त सकाळी मुलांसाठी विशेष कार्यक्रम.. विशेष शाळा जीवदान स्पेशल स्कूल झाराप येथे आयोजन करण्यात आलेले आहे .
तर याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा .असे आवाहन इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपी महिला सेलच्या सिंधुदुर्ग सह समन्वयक/ पदाधिकारी डॉ प्रगती शेटकर, डॉ शरावती शेट्टी, डॉ चैताली प्रभू यांनी केले आहे .
अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क साधावा.. डॉ. शरावती शेट्टी ७२०८१७११९०, डॉ. प्रगती शेटकर -९०२२४३५५७९ असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ