सोनुर्ली विद्यालयात संस्कारक्षम विज्ञान जत्रा

सावंतवाडी : श्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ सोनुर्ली संस्थेच्या माऊली माध्यमिक विद्यालयात सायन्स फेअर (विज्ञान जत्रा ) २०२३ चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी भारतीय संस्कृतीचे महात्म्य सांगणारा माता पिता पाद्य पूजा करून केलेला पालकांचा सन्मान सर्वच मान्यवरांच्या,पालकांच्या डोळ्यात अश्रू आणणारा व कौतुकास पात्र ठरला.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अनंत परब ,सचिव तथा शालेय समिती अध्यक्ष नागेश गावकर,सहसचिव गोविंद धडाम,बापू मोर्ये,शरद धाऊसकर,आनंद नाईक,राजेंद्र उर्फ बाळा गावकर, माऊली देवस्थान प्रमुख राजेंद्र गावकर,मळगाव केंद्र प्रमुख शिवाजी गावित,मळेवाड केद्र प्रमुख म.ल.देसाई,माडखोल केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर,इन्सुली केंद्र प्रमुख लक्ष्मीदास ठाकूर, आरोस केंद्र प्रमुख कमलाकर ठाकूर,सोनुर्ली शाळा मुख्याध्यापिका राणे मॅडम, पेंडूर शाळा मुख्याध्यापिका देवयानी आजगावकर ,न्हावेली शाळा मुख्याध्यापिका स्मिता नाईक मॅडम,मळेवाड शाळेचे मुख्याध्यापक लवू सातार्डेकर,शिक्षक संघटना नेते त्रिंबक आजगावकर ,पर्यावरण स्नेही संस्था –नेफडोच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रा.पूजा गावडे, गोवा सायन्स सेंटरचे ट्रेनी रोहित निकम,वसुंधरा विज्ञान केंद्राच्या तज्ञ विभावरी पराडकर,स्टेम लर्निंगचे तज्ञ गणेश लाड ,सीसीआरटीचे जिल्हा समन्वयक अरुण तेरसे,एन.जे.गवंडळकर, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष विकास जेठे,प्रयोग शाळा संघटनेचे संतोष ओटवणेकर, न्हावेली शाळेचे उपक्रमशील शिक्षक रावण सर परिसरातील प्राथमिक ,माध्यमिक शाळांचे शिक्षक,पालक,सोनुर्ली विद्यालयाचे माजी विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विज्ञान प्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते.
विद्यालयाचे राज्यपुरस्कारप्राप्त विज्ञान शिक्षक तथा सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पी.जी.काकतकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्याक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक जी.एस.मोर्ये यांनी केले, सूत्रसंचालन प्रदीप सावंत यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ,नवयुवक कलाक्रीडा मंडळ पाक्याचीवाडी,सोनुर्ली सहकारी सोसायटी,शब्द सखा मित्र मंडळ,शिक्षक पालक संघ,माजी विद्यार्थी संघटना व सोनुर्ली ,न्हावेली निरवडे व पेंडूर येथील ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य मिळाले.पंच क्रोशीतील विद्यार्थ्यांची मोफत वाहतूक संस्था संचालक आनंद नाईक यांचाकडून करण्यात आली.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण गोवा सायन्स सेंटर,पणजी यांचे सायन्स ऑन व्हीलचे प्रयोग,स्टेम लर्निग मुंबई यांचे कृतीयुक्त प्रयोग,वसुंधरा विज्ञान केंद्र ,नेरुरपार यांची फिरती प्रयोग शाळा,फिल्म शो,आकाश दर्शन,शालेय विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक रांगोळ्या,पर्यावरण संरक्षण पोस्टर प्रदर्शन,सी.सी.आर.टी. –“आझादी का अमृत महोत्सव” निमित्त – अनटोल्ड स्टोरीज ऑफ फ्रीडम फायटर असे विज्ञान विषयाशी संबधित विविधांगी होते.
प्रतिनिधी / कोकण नाऊ / सावंतवाडी