शनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी हळवल येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर

मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन
कणकवली – शनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत श्रीराम मंदिर हळवल येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लोकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे
श्रीराम सेवा मंडळ मुंबई हळवल आणि विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली या प्रसिद्ध हॉस्पिटलच्या वतीने या मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
मोतीबिंदू तपासणी मशीनद्वारे चष्मा तपासणी सवलतीच्या दरात मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात चष्मे वाटप अशी या शिबिराची वैशिष्ट्ये आहेत अधिक माहिती हवी असल्यास 84 0 88 536 या क्रमांकावर संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे