मावळा प्रतिष्ठान गडसंवर्धन, कोल्हापूर

मावळा प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले रांगणा स्वच्छता मोहीम घेण्यात आली या मोहीमे मध्ये शंभुराजे प्रतिष्ठान नंदवाळ येथील २५ मावळ्यांनी सहभाग घेतला किल्ले रांगणा वरील निंबाळकर वाड्यातील निंबाळकर बावडी (विहीर) हि एकमेव अशी विहीर आहे ज्या विहीरीला बारमाही पाणी व जिवंत पाण्याचे झरे आहेत पिण्यायोग्य असणारे पाणी उन्हाळ्यात हि थंड असणारे पाणी पण अनेक वर्षे या विहीरीतील पाणी गाळ साचून या विहीरीतील पाणी गढुळ होत होते अनेक वर्षे हि विहीर अस्वच्छ असल्या मुळे पाणीची पातळी सुध्दा उन्हाळ्यात कमी होत होती मावळा प्रतिष्ठान व शंभुराजे प्रतिष्ठान च्या मावळ्यांनी या विहिरीत असणारा किमान तीन ट्रॉली गाळ या विहिरीतुन बाहेर काढला किमान ७ ते ८ फुट खोली पर्यंत हा गाळ साचला होता अत्यंत कष्टाने हा गाळ व विहीरीत असनारे दगड मावळ्यांनी बाहेर काढले सदर विहीरी मधून काही शिवकालीन वस्तु सुध्दा सापडल्या या मध्ये तोफगोळा ,मातीचे भांडे, दगडी वरवंटा,व लहान मंदिराचा दगडी कळस यांचा समावेश आहे सदर वस्तू पुरातत्व विभागाकडे जमा करण्यात येणार आहेत, या मोहीमे मध्ये काही मावळ्यांना इजा सुध्दा झाली पण मावळ्यांनी कशाची ही पर्वा न करता अत्यंत जिद्दीने हि मोहीम पार पाडली या मोहीमेसाठी नंदवाळच्या मावळ्यांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले तसेच ,संतोष गायकवाड ( श्रेया किराणा व जनरल स्टोअर्स, गायकवाडी) यांनी मावळ्यांच्या जेवणा साठी लागणारे संपूर्ण बाजार गजाननदादा बोंगार्डे यांच्या मार्फत पाठवला होता संतोष दादाचे मावळा प्रतिष्ठान सदैव ऋणी राहील या मोहीमेसाठी सहभागी व ज्यांनी आर्थिक व मानसिक तसेच मौलिक सल्ला देणारे हितचिंतक यांचे मावळा प्रतिष्ठान व शंभूराजे प्रतिष्ठान नंदवाळ सदैव ऋणी राहील आपला 🚩मावळा प्रतिष्ठान गडसंवर्धन कोल्हापूर🚩.

error: Content is protected !!