फोंडाघाट भाजपाच्या वतीने राणेंच्या उमेदवारी निमित्त आनंदोत्सव!

फोंडाघाट बस स्थानकात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांकडून राणेंचे समर्थन

कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणेंच्या पुढाकारातून जोरदार जल्लोष

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फोंडा विभागाच्या वतीने फोडाघाट बस स्थानकामध्ये भाजपाच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला. नारायण राणे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव केला. यावेळी मनोज रावराणे ,राजन चिके,संतोष कानडे,बबन हळदीवे, विश्वनाथ जाधव,अजय रावराणे,राजा डिचवलकर,गजानन सावंत,सुनील रावराणे,अलंकार राव राणे,समीर रावराणे,अनिकेत पारकर,मिलिंद लाड,अमित चव्हाण,रूपेश चव्हाण,एकनाथ कातरूड आदि उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर, कणकवली

error: Content is protected !!