केंद्रीय मंत्री नारायण राणेंना उमेदवारी जाहीर, कणकवलीत जल्लोष

पटवर्धन चौक, शहर भाजप कार्यालयासमोर फटाके फोडत कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव

नारायण राणे आगे बढो, च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

गेले अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या मतदारसंघासाठी अखेर महायुती, भाजपचे उमेदवार नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे कणकवलीत राणेंच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला. कणकवली येथे शहर भाजपच्या कार्यालयाजवळ तसेच कणकवली पटवर्धन चौक येथे फटाके लावून भाजपा व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जि प अध्यक्ष संजना सावंत, कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, निखिल आचरेकर, सचिन पारधीये, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, स्वप्निल चिदरकर, माजी नगरसेवक मेघा गांगण, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, सुशील पारकर, समीर सावंत, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राजू हीर्लेकर, राजा पाटकर, परशुराम झगडे, नवराज झेमणे, तेजस लोकरे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!