कवठी येथून देवदर्शन यात्रेला सुरुवात

कुडाळ : संजय करलकर मित्रमंडळ कवठी आयोजित देवदर्शन यात्रा कर्नाटक आणि गोवा या राज्यात आजपासून सुरू झाली. ही यात्रा आज आणि उद्या २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत संपन्न होईल. आज सकाळी कवठी एसटी स्टॅण्ड येथून देवदर्शनासाठी ही बस रवाना झाली. या यात्रेत कारवार बीच, गोकर्ण, होनावर, इको बीच, कांडला वन, इडगुंजी महागणपती, मुरुडेश्वर, कोलहुर, मंगेशी आणि शांतादुर्गा या ठिकाणी जाणार आहे. शिवसेना ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांनी या देवदर्शन यात्रेत सहभागी झालेल्या भक्तांना शुभेच्छा दिल्या.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ
