सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी प्रकाश उर्फ दाजी करंगुटकर यांचे निधन

मूळ देवगड वाडा तर येथील रहिवाशी व सध्या राहणार कणकवली बाजारपेठ सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी प्रकाश राजाराम करंगुटकर (वय 65) यांचे आज निधन झाले.
वर्दीची सेवा करताना त्यांनी आपल्या सेवेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी सेवा बजावली. कडक शिस्तीचे कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून त्यांची ओळख होती. निवृत्तीनंतर ते कणकवली स्थायिक झाले. शहरातील सार्वजनिक उपक्रमात त्यांचा नेहमी सहभाग असे. कणकवली शहरात त्यांना दाजी म्हणून ओळखत असत. गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर गोवा बांबूळ येथे उपचार सुरू होते. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर वाडातर येथील स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील विविध ठिकाणहून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी. विवाहित मुली. भाऊ भावजया, पुतणे, जावई असा मोठा परिवार आहे.
कणकवली /प्रतिनिधी