शासकीय रेखाकला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत दुर्वा रूपेश केळुसकर राज्य गुणवत्ता यादीमध्ये ७२ वी

दूर्वा च्या यशाबद्दल तिचे केले जातेय कौतुक

शैक्षणिक वर्ष २०२३_२४ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत कु. दुर्वा रूपेश केळुसकर राज्य गुणवत्ता यादीमध्ये ७२ वी आली आहे. दुर्वा सेंट उर्सुला स्कूलची विद्यार्थ्यांनी असून इ.९ वी मध्ये शिकत आहे. यापूर्वी कणकवली पर्यटन महोत्सव, प्रज्ञांगण तरळे, मराठा समाज शिवजयंती उत्सव कणकवली, कला अध्यापक महाविद्यालय कणकवली, रंगोत्सव या सारख्या नामवंत स्पर्धा मधून पारितोषिके मिळविली आहेत. दुर्वालाचित्रकला, रंगभरण, रांगोळी, हस्तकला (क्राफ्ट) यासाठी नंदकुमार हजारे, बांदेकर कला महाविद्यालय चे संतोष मोरजकर, सिद्धेश नेरूरकर, तसेच प्रशाळेच्या कला शिक्षिका शिल्पा दळवी यांचे मार्गदर्शन लाभले. दुर्वाच्या या यशाबद्दल शिक्षक व पालक वर्गाकडून कौतुक होत आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!