लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करा -किरण सामंत

खारेपाटण आणि कासार्डे जि. प. मतदारसंघात शिवसेनेचा मेळावा संपन्न

खारेपाटण आणि कासार्डे जि. प मतदारसंघात शिवसेनेच्या माध्यमातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावे घेण्यात आले असून खारेपाटण तळेरे विभाग तसेच कासार्डे नांदगाव विभागात प्रत्येक बूथ निहाय बैठका घेण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्या पासून शिवसेना नेते भैया सामंत यांनी या विभाग कडे विशेष लक्ष दिले असून जिल्हाप्रमुख संजय आंग्रे,विधानसभा प्रमुख संदेश पटेल व युवासेना जिल्हा प्रमुख सुकांत वरुणकर यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही विभागात मेळावे नुकतेच पार पडले. या प्रसंगी शिवसेना नेते किरण उर्फ भैया सामंत उपस्थित होते. या वेळी बोलताना भैया सामंत यांनी महा युतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येण्यासाठी व मा.प्रधान मंत्री मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा असे आदेश कार्यकर्त्यांना दिले.
याप्रसंगी दोन्ही विभागातील कार्यकर्ते पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ प्रदीप धवन , तालुका प्रमुख शरद वायंगणकर, उप तालुका प्रमुख -मंगेश गुरव,विभाग प्रमुख -गुरु शिंदे, वाहतूक संघटना प्रमुख संजय नकाशे, जिल्हा कृषी उत्पन्न संचालक मंगेश ब्राह्मदंडे , महिला तालुका प्रमुख प्रिया टेमकर, वैभाववाडी तालुका प्रमुख संभाजी रावराणे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!