२०मार्च रोजी सरंबळ येथे मोफत नेत्रतापासणी शिबिर

नॅब मिरज, विवेकानंद नेत्रालय यांचे आयोजन
मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन
कुडाळ – नॅब नेत्रारुग्नालय मिरज संचालित विवेकानंद नेत्रालय आणि रेटीना सेंटर कणकवली यांच्या वतीने बुधवार दिनांक २०मार्च रोजी सकाळी१०ते दुपारी २या वेळेत मोफत नेत्र्तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कुलस्वामिनी कृषी सेवा बचत गट सरंबळ. यांच्या पुढाकाराने या मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे गावडे सभागृह ग्रामपंचायत सरंबळ येथे हे मोफत नेत्रशिबिर होणार आहे.
या शिबिरात मोतीबिंदू तपासणी निदान, गरज अस्नाऱ्यास मोफत ड्रॉप्स, डोळ्यांच्या पडद्याची तपासणी, डोळ्यांचा कोरडे पणा, निराधार व्यक्तींना मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत काचबिंदू निदान तपासणी,,चष्म्याचा अचूक नंबर, दृष्टी क्षमता आणि नेत्र तपासणी आदी तपासण्या करण्यात येणार आहे.
या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.