आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये “मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात साजरा.

कणकवली/मयुर ठाकूर

ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेत मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध कवी व लेखक सन्माननीय श्री.कमलेश गोसावी हे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते .त्यांनी सादर केलेल्या मराठी व मालवणी दर्जेदार कवितांना विद्यार्थ्यांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला यांच्या वतीने दरवर्षी श्यामची आई या कादंबरीवर घेण्यात येणाऱ्या परीक्षेतील विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. मराठी गीता, काव्यवाचन ,व श्यामची आई या नाटीकेने प्रेक्षकांची वाहवा मिळवली या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल तसेच सल्लागार डी.पी तानावडे यांनी शुभेच्छा देताना मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले .
छत्रपतीं शिवाजी महाराज यांच्या पोवाड्याने कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमासाठी ज्ञानदा शिक्षण संस्था अध्यक्ष डॉविद्याधर तायशेटे,कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल सल्लागार डी.पी तानावडे कोकण नाऊ चे प्रतिनिधी श्री.मयूर ठाकूर ,आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई मॅडम,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .
सूत्रसंचालन प्रशालेची विद्यार्थिनी कु.खुशी आमडोसकर हिने केले.

error: Content is protected !!