वीज ग्राहकांना 100 टक्के अचूक वीज बिले द्यावीत

सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील आढावा बैठकीत मा.श्री. डांगे यांच्या सूचना

ब्युरो । रत्नागिरी : मीटर रिडींग प्रक्रियेत सुधारणा आणून वीज ग्राहकांना वीज वापरानुसार अचूक वीज बिले देण्याच्या मागील एक वर्षातील नियोजनबद्ध प्रयत्नांना अपेक्षित यश मिळाले आहे. वाढीव, सरासरी वा अंदाजे बिलिंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. वीज ग्राहकांना 100 टक्के अचूक वीज बिल मिळावे. या दृष्टीने मीटर रिडींग प्रक्रिया राबवावी, अशा सूचना सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे (भाप्रसे) यांनी आढावा बैठकीत दिल्या. वीज ग्राहकांनी वीज बिले नियमित भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील दि. 17 व 18 फेब्रुवारी रोजीच्या आढावा बैठक प्रसंगी मुख्य अभियंता मा.श्री.विजय भटकर, अधीक्षक अभियंता श्री.नितीन पळसुलेदेसाई, श्री.विनोद पाटील, कार्यक्षेत्रातील संबंधित कार्यकारी अभियंता व स्थानिक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. शेतीच्या प्रलंबित वीज जोडण्या मार्च 2023 अखेर द्याव्यात, कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकांची तपासणी मोहीम राबवावी, महावितरण ग्राहकांना दैनंदिन वीज खरेदी करून वीज पुरवठा करते. वीज बिल वसूलीतून जमा होणाऱ्या महसुलावर महावितरणची भिस्त आहे. 100 टक्के थकीत वीज बिल वसुली शिवाय पर्याय नाही. तेंव्हा थकीत वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट साध्य करावे,अशा सक्त सूचना मा.श्री. डांगे यांनी बैठकीत दिल्या.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, रत्नागिरी.

error: Content is protected !!