कणकवलीत एकावर धारदार हत्याराने वार
हत्याराच्या वाराने जखमी झालेल्या वर कणकवलीतील रुग्णालयात उपचार सुरू
शनिवारी रात्री उशिराची घटना
कणकवलीतील या घटनेने खळबळ
दिगंबर वालावलकर । कणकवली : ओमनी कारने समोरून दुचाकीला हुल दिल्या च्या कारणातून झालेल्या बाचाबाची तुन धारदार कटर सदृश्य हत्याराने गौतम धर्मचंद्र हिंदळेकर (कणकवली सिद्धार्थनगर) याच्यावर वार केल्याप्रकरणी महेंद्र गोपाळ चव्हाण (43 माऊली नगर कणकवली) याच्यावर कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी असलेला गौतम धर्मचंद्र हिंदळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी महेंद्र चव्हाण याच्यावर भादवी कलम 324,323,504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर याच प्रकरणी महेंद्र चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीनुसार गौतम धर्मचंद्र हिंदळेकर याने समोरून आलेली गाडी तुला दिसत नाही का असे विचारत शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दगडाने उजव्या खांद्यावर मारून दुखापत केल्याप्रकरणी गौतम धर्मचंद्र हिंदळेकर याच्यावर 324,323,504 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 10 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास कणकवली येथे घडली. दरम्यान यातील गौतम धर्मचंद्र हिंदळेकर याच्यावर कटर सदृश्य धारदार हत्याराने वार केल्याने त्याच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. याबाबत गौतम हिंदळेकर याने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी महेंद्र चव्हाण याने ओमनी कार ने समोरून येणाऱ्या गौतम चव्हाण यांच्या मोटरसायकलला हुल दिली. त्यावेळी तुला समोरून येणारी गाडी दिसत नाही का. असे विचारले असता महेंद्र चव्हाण यांने कटर सारख्या धारदार हत्याराने गौतम हिदळेकर याच्यावर वार केले. यात गौतम हिंदळेकर हा जखमी झाला.
तर महेंद्र चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी गौतम हिंदळेकर हा फिर्यादीच्या कार समोरून दुचाकीने येताना कार घाबवत फिर्यादी महेंद्र चव्हाण याने तुला समोरून येणारी गाडी दिसत नाही का? असे विचारले असता गौतम हिंदलेकर याने शिवीगाळ करत असताना महेंद्र चव्हाण याने आपण या विषयावर शांतपणे बोलू असे म्हटले असता संशयित आरोपी ने महेंद्र चव्हाण याला गाडीतून बाहेर काढत हाताच्या ठोशाने पाठीवर मुका मार दिला. व तिथे पडलेला दगड उजव्या खांद्यावर मारून दुखापत केली अशी फिर्याद दिली आहे. या दोन्ही घटनांच्या अनुषंगाने परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या असून त्यानुसार दोन्ही संशयीतावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद सुपल करत आहेत.
दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ, कणकवली