कनेडित भर वस्तीमध्ये बिबट्याचे दर्शन
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वनविभागाकडून बिबट्याच्या वावराची पाहणी
प्रतिनिधी । कणकवली : कणकवली तालुक्यातील सांगवे कनेडी येथील संभाजीनगर येथे सुनील दौलतराव सावंत यांच्या घरी रविवार दिनांक 11फेब्रुवारी रोजी मध्य रात्री 1 च्या सुमारास बिबट्या कुत्र्याचा पाठलाग करीत व्हरांड्यात येऊन गेल्याची बाब निदर्शनास आली. कुत्र्याचा भुंकण्या चा आवाज ऐकून घराचा दरवाजा उघडताच बिबट्या पळून जाताना त्यांच्या निदर्शनास आला. तेथेच राहात असलेल्या वनरक्षक मणेर यांच्या ही बाब निदर्शनास आणताच त्यांनी बागेतल्या पावलांचे निरीक्षण केले असता बिबट्या ची पाऊले असल्याची माहिती दिली.
कनेडी बाजारपेठेलगत बिबट्याने हजेरी लावलेले आता या भागामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनखात्याने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांनी वनविभागाकडे केली आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कणकवली