गावची आठवण झाली नाही हेच कुडाळवासीयांचे प्रेम – अमोल पाठक 

बदलीनिमित्त तहसीलदार अमोल पाठक याना भावपूर्ण निरोप 

साहेब, जिल्हाधिकारी म्हणून पुन्हा सिंधुदुर्गात या !

प्रतिनिधी । कुडाळ : गावापासून सहाशे किलोमीटर दूर असूनही कुडाळवासियानी कधी गावाची आठवण येऊ दिली नाही.  कुडाळवासीयांनी दिलेले प्रेम आपुलकी सोबत घेऊन जाताना या सर्व आठवणी हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवीन,असे भावनिक उदगार काढले ते कुडाळचे मावळते तहसीलदार अमोल पाठक यांनी. तहसीलदार अमोल पाठक याना कुडाळवासियांच्या वतीने आयोजित केलेल्या निरोप समारंभात ते बोलतहोते.  दरम्यान श्री पाठक हे सिंधुदुर्गात जिल्हाधिकारी म्हणून यावेत अशा शुभेच्छाही  कुडाळवासियांच्या वतीने देण्यात आल्या. 
    कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांची पालघर जिल्ह्यातील तलासरी येथे तहसीलदारपदी बदली झाली आहे.  त्यानिमित्ताने रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित सर्व कुडाळवासियांच्या वतीने त्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम कुडाळ येथील मराठा समाजाच्या सभागृहात विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.  
   यावेळी  जेष्ठ गुरुवर्य का आ सामंत, सौ पाठक, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रणजित देसाई, गजानन कांदळगावकर, शशी चव्हाण, प्रणय तेली, राजन बोभाटे, काका कुडाळकर, रोटरी क्लब कुडाळ अध्यक्ष दिनेश आजगावकर, अभिषेक माने, प्रमोद भोगटे, डॉ संजय केसरे, ओंकार तेली, बंड्या सावंत, राजेंद्र केसरकर, भास्कर परब, सचिन मदने, अमित वळंजू, मकरंद नाईक, राजेश पडते, नजीर शेख, प्रदिप नाईक, मोमीन दोस्ती, अभी गावडे, विजय वालावलकर, नितीन शिरसाट, नीता गोवेकर, सई तेली, मयूर बांदेकर, गुरुनाथ मुंज, हरिश्चंद्र  वेंगुर्लेकर, स्वरूप सावंत, ओंकार तेली, समीर दळवी, महेश शिरसाठ,  कुडाळवासिय, विविध संस्था,  सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आदी उपस्थित होते. 
      यावेळी बोलताना श्री पाठक  म्हणाले कुडाळ तहसीलदारपदाचा गेले साडेतीन वर्ष कार्यभार स्वीकारताना कुडाळवासियांनी मला भरभरून प्रेम आपुलकी कौटुंबिक स्नेह या कुडाळमध्येच दिले.  कुडाळपासून सुमारे सहाशे किलोमीटर अंतरावर असणारे माझे गाव या गावाची कधीच आठवण कुडाळवासियानी करू दिली नाही एवढे ऋणानुबंध या कुडाळशी जोपासले गेले.  प्रशासकीय नोकरी म्हटली की बदली आलीच.  आज निरोप घेताना अवघड होत आहे.  पण शेवटी बदली अपेक्षित आहे.  आपण अलौकिक प्रेम स्नेह दिला हे कधीच विसरू शकत नाही.  तहसीलदारपदी कार्यरत असताना सुद्धा सांस्कृतिक क्षेत्रात वाटचाल कशी करावी, कलेचा प्रवाह कसा ठेवावा, हे सुद्धा मला कुडाळनेच शिकवले.   रोटरी सारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय संस्थेचा मी एक सभासद झालो हे माझ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची बाब आहे.  एकूणच कुडाळवासियांशी असणारे  नाते आपुलकी प्रेम हे कधी न संपणारे आहे.  या तुमच्या सर्व आठवणी सोबत घेऊन हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
         कुडाळवासीयांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देताना अनेकांना अश्रू अनावर झाले.  तहसीलदार पाठक हे जनसेवक लोकसेवक म्हणून या ठिकाणी वावरले.  ते  कुडाळवासियांच्या हृदयात राहणारे आहेत.  कर्तव्यदक्ष अधिकारी कसा असावा यांचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे अमोल पाठक होय.  सर्वसामान्यांसह सर्वाची कामे त्यांच्या हाती जलदगतीने झाल्याचा अनेकांना अनुभव आला.  त्याचे दालन सर्वासाठी खुले होते.  आतमध्ये गेलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर बाहेर पडताना काम झाल्याचा आनंदी चेहरा अनेकांनी अनुभवला.   त्यांचा साडेतीन वर्षाचा हा कालावधी कधी संपला हे समजले नाही.  विशेष म्हणजे ते एक प्रशासकीय अधिकारी असताना सुद्धा सर्वांसाठी एक मित्र म्हणून राहिले.  अनेकांना ते मार्गदर्शक ठरले.  त्यांच्या निरोप समारंभाने त्यांची या ठिकाणी असलेली पोकळी निश्चितच निर्माण झालेली आहे. अशा शब्दात कुडाळवासियांनी त्यांना निरोप दिला. 
    प्रशासकिय क्षेत्रात त्यांनी वाटचाल करताना पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी प्रांताधिकारी किंवा जिल्हाधिकारी म्हणून यावे आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी कुडाळवासीय  निश्चितच सज्ज राहतील, अशा शुभेच्छा  यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रति देत आपल्या भावना व्यक्त केल्या.  यावेळी त्यांना निरोप देताना अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.  श्री पाठक सुद्धा गहिवरून गेले.  यावेळी त्यांना कुडाळवासियांच्या वतीने शाल श्रीफळ  भेटवस्तू प पू स्वामी समर्थ, प पू राऊळ महाराज यांची प्रतिमा तसेच रोटरी क्लब कुडाळच्या वतीने त्यांचा निरोपपर सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष सचिन मदने यांनी केले. 

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!