शिवजयंती उत्सव समितीच्या विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

छ. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजन

भव्य चारचाकी रॅली व आश्रमांना जीवनावश्यक वस्तूवाटप

प्रताप भोसले यांच्याकडून भव्य आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समिती कणकवलीतर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम उत्साहात पार पडले. यावेळी काढण्यात आलेल्या चारचाकी रॅलीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी आश्रमांना त्यांच्या मागणीनुसार जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधिलकीही जपण्यात आली. शिवाजी महाराजांनी सामाजिक बांधिलकीची शिकवण दिली. महाराजांचे विचार जपण्याचा प्रयत्न आम्ही सदोदीत करत राहू असे प्रतिपादन शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा मराठा सेवा संघाचे कोकण प्रांत सचिव प्रताप भोसले यांनी केले.
शिवजयंतीनिमित्त समितीतर्फे चारचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचा प्रारंभ वरवडे येथे स्वाभिमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष कान्हा मालंडकर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी वरवडे सरपंच करूणा घाडीगांवकर, बिडवाडी सरपंच सौ. पूजा चव्हाण, पिसेकामते सरपंच सौ. प्राजक्ता मुद्राळे, कलमठ उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, पिसेकामते माजी सरपंच सुहास राणे आदी उपस्थित होते. रॅलीचे कलमठ बाजारपेठ येथे आयोजित शिवजयंती उत्सवठिकाणी सुशांत राऊळ, नितीन पेडणेकर, आबा मेस्त्री, सचिन पेडणेकर, नीतेश भोगले आदींनी स्वागत केले. आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे आयोजित शिवजयंती उत्सवस्थळी भेट देण्यात आली. शिवाजीनगर येथील शिवजयंती उत्सवात राजू वर्णे व शिवभक्तांनी रॅलीचे स्वागत केले. शिवाजी महाराज मित्रमंडळ चौक येथे अनंत पारकर, मयूर खुटाळे आदींनी रॅलीचे स्वागत केले. सकल मराठा समाज आयोजित शिवजयंती उत्सवास भेट देण्यात आली, तेथे सुशील सावंत, बच्चू प्रभूगांवकर, बबलू सावंत आदींनी स्वागत केले व रॅलीचा समारोप झाला.
रॅलीनंतर असलदे येथील दिवीजा वृद्धाश्रम व पणदूर येथील संविताश्रम या दोन्ही आश्रमांना भेट देऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. शिवजयंती उत्सव समितीने शिवाजी महाराज यांनी दिलेली सामाजिक बांधिलकीची शिकवण जपली असल्याचे कौतुकोद्गार संविताश्रमाचे प्रमुख संदीप परब यांनी काढले. तर शिवजयंती उत्सव समितीने जपलेल्या सामाजिकतेचा आदर्श अन्य मंडळांनीही घ्यायला हवा, असे उद्गार दिवीजा वृद्धाश्रमाच्या प्रमुख दीपिका रांबाडे यांनी काढले .
समितीतर्फे ग्रामीण कासरल, कसवण, बिडवाडी येथे शिवजयंती उत्सवांना भेटीही देण्यात आल्या. दिवसभराच्या उपक्रमांमध्ये संजय साळसकर, माजी उपसरपंच आनंद साटम, अजिंक्य लाड, बाबू राऊळ, पप्पू पुजारे, अमित पवार, शैलेश जाधव, बाळा सावंत, आनंद घाडीगांवकर, अमोल घाडीगांवकर, संदीप घाडीगांवकर, सुभाष मालंडकर, अर्चित कदम, समीर कदम, ग्रा. पं. सदस्य प्रदीप कदम, राज सावंत, शेखर रावराणे, पुरुषोत्तम लाड, बाबजी चव्हाण, अभिजीत सावंत, नितीन मुद्राळे, रुपेश नाडकर्णी, यश सावंत, पांडू मेस्त्री, बबन मेस्त्री, सतीश मेस्त्री, समीर देसाई, अपू देसाई, सिजर फर्नांडिस, संकेत राणे, प्रसाद बावकर आदी सहभागी झाले होते.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!