कणकवलीचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज जन्मोत्सवानिमित्त पालखी सोहळ्यात सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक झाले सहभागी.

कणकवली/मयुर ठाकूर.
कणकवलीच आराध्य दैवत परमहंस भालचंद्र महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. गेले काही दिवस भालचंद्र महाराज यांच्या मठामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यामध्ये भजन,कीर्तन, नामस्मरण अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचा सहभाग होता.आज परमहंस भालचंद्र महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या निमित्ताने संपूर्ण बाजारपेठेमध्ये ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढली जाते.या पालखी मिरवणुकीमध्ये राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी देखील सहभाग घेतला.तसेच या पालखी सोहळ्यात अबीद नाईक हे वारकऱ्यांसोबत धार्मिक वातावरणात तल्लीन होताना पाहायला मिळाले.