रविकिरण तोरसकर यांची तज्ज्ञ समितीमध्ये निवड
महाराष्ट्र मासेमारीबाबत अधिनियम 1960 मधील मध्ये सुधारणा करणे करिता गठित समिती
ब्युरो । मालवण : आत्मनिर्भर मत्स्य शेतकरी संघटना सिंधुदुर्गचे समन्वयक रविकिरण चिंतामणी तोरसकर यांची महाराष्ट्र मासेमारीबाबत अधिनियम 1960 मध्ये सुधारणा करण्याकरिता गठित समितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून डॉक्टर केतन चौधरी यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील विविध भुजलीय मच्छिमार संघटनांनी, महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय अधिनियम 1960 मध्ये सुधारणा करून सुधारित भूजलाशयीन मासेमारी अधिनियम लागू करणे बाबत गेली अनेक वर्ष मागणी केली होती. सदर मागणीचा आदरपूर्वक विचार करून महाराष्ट्र शासनाने भूजलाशयीन म्हणजेच धरणे,तलावे शेततळी व इतर ठिकाणी असणारे गोड पाणीच्या संबंधित मत्स्यव्यवसायत होणारी वाढ लक्षात घेऊन महाराष्ट्र मासेमारी अधिनियम 1960 मध्ये सुधारणा करण्यासाठी तज्ञ समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती .संबंधित विषयात महाराष्ट्र शासनाने 15 फेब्रुवारी 2023 रोजी शासन निर्णयाद्वारे अशा प्रकारच्या समितीत मान्यता दिली आहे .यामध्ये सोळा सदस्यीय समितीमध्ये मत्स्य व्यवसाय आयुक्त हे अध्यक्ष असून मत्स्यव्यवसायाशी इतर सात सरकारी प्रमुख संस्थांचे प्रतिनिधी आहेत. याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातून मत्स्यपालन व मत्स्यव्यवसाय संबंधित काम करणाऱ्या 9 सदस्यांचा समावेश आहे. सदर नऊ सदस्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रविकिरण तोरसकर निवड झाली असून रत्नागिरी जिल्ह्यातून डॉक्टर केतन चौधरी यांची निवड झाली आहे. सदर समितीचा कालावधी सहा महिन्याचा असून सहा महिन्याच्या कालावधीत संबंधित महाराष्ट्र मासेमारी अधिनियम 1960 मध्ये आवश्यकते बदल अथवा सुधारित धोरण मसुदा शासनास सादर केला जाणार आहे .
भूजलाशयीन मासेमारी अधिनियमांमध्ये कालानुरूप बदल करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने समिती स्थापन केली. त्याबाबत तोरसकर यांनी शासनाचे अभिनंदन केले आहे. यामुळे मत्स्यपालन या क्षेत्रात मत्स्यसंवर्धक अथवा मत्स्य शेतकरी यांना भेडसावणाऱ्या समस्या दूर होण्यास मदत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच सदर समितीमध्ये श्री. तोरसकर यांची निवड करण्यासाठी पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण व जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे रविकिरण तोरसकर यांनी आभार मानले आहेत.
ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, मालवण.