सिंधूरत्न समृद्धी योजने अंतर्गत आऊटबोट नौका इंजिन गॅस किट साठी भरीव तरतूद
सिंधुरत्न समृद्धी योजना सदस्य माजी आमदार प्रमोद जठार यांचा यशस्वी पाठपुरावा
मत्स्य व्यवसाय खात्याने नुकतेच मच्छीमारांसाठी पर्याय इंधन म्हणून गॅसवरील इंजिनची मासेमारी लोकांसाठी चाचणी घेतली होती. सदरच्या चाचण्या मालवण व देवगड बंदर या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडल्या. सद्यस्थितीत नौकाना वापरण्यात येणाऱ्या आउटबोट मशीनसाठी पेट्रोल हे इंधन वापरले जाते .इंधनाचे वाढते दर यामुळे मत्स्य व्यवसायामध्ये मोठ्या खर्च इंधनावर होतो. त्याचा थेट परिणाम मच्छीमारास अथवा पर्यटन व्यवसायिक याना मिळणाऱ्या उत्पन्नावर होतो. गॅसवरील इंजिन मुळे इंधनावरील खर्च सुमारे 60 टक्क्यापर्यंत कमी होणार आहे.तसेच सागरी प्रदूषणामध्ये पण घट होणार आहे . सद्य स्थितीत वापरण्यात येणाऱ्या पेट्रोल वरील इंजिन चे गॅस मध्ये रूपांतरित करण्यासाठी सुमारे ४०ते ५० हजार रुपये अपेक्षित खर्च आहे .यासाठी शासनाने सिंधुरत्न समृद्धी योजनेमध्ये मच्छीमार व पर्यटन नौकासाठी अनुदान द्यावे म्हणून भाजपा मच्छीमार सेल ने सिंधूरत्न समृद्धी योजना चे सदस्य माजी आमदार श्री.प्रमोदजी जठार यांच्याकडे दांडी मालवण येथे मागणी केली होती. सदर मागणीचा मत्स्य व्यवसायिक व पर्यटन व्यवसायिक याना होणारा फायदा लक्षात घेऊन,श्री.प्रमोद जठार यांनी शासन दरबारी योग्य पाठपुरावा केला.प्रशासनाने त्याची योग्य दखल घेत पेट्रोल अथवा केरोसिन इंधन वर चालणाऱ्या आऊटबोट नौका इंजिन एलपीजी वर परावर्तित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस किट साठी रू ३५०००/-(पस्तीस हजार मात्र) अनुदान मंजूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नौका साठी करण्यात आले आहे.पहिल्या त्यामध्ये टप्प्यामध्ये 30 आउटबोट मशीन धारक मासेमारी नौका, पर्यायी इंधन म्हणजेच एलपीजी गॅस यामध्ये परावर्तित करण्यासाठी शासनाने आदेश काढला आहे .तरी सर्व मच्छीमारांनी इंधन बचतीचा हा नवा मार्ग अवलंब करावा तसेच इतर योजना चा लाभ घेण्यासाठी सम्पर्क साधावा अशी विनंती भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात येत आहे. सदर योजने साठी शिक्षण मंत्री आमदार दीपक भाई केसरकर व मा. सहाय्यक.मत्स्य आयुक्त श्री.अलगिरी आणि मत्स्य कार्यालय,सिंधुदुर्ग यांनी विशेष प्रयत्न केले त्याबद्दल रविकिरण तोरसकर संयोजक यांनी समाधान व्यक्त केले आहे.
मालवण(प्रतिनिधी)