चिंदरचे माजी पोलिस पाटील प्रभाकर पाताडे यांचे निधन
आचरा : चिंदर गावचे माजी पोलीस पाटील तसेच श्री देवी सरस्वती वाचनालयाचे अध्यक्ष, चिंदर गावचे प्रमुख मानकरी प्रभाकर सिताराम पाताडे वय वर्ष (८७) यांचे रविवारी सकाळी राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. चिंदर गावचे पोलीस पाटील म्हणून त्यांनी 35 वर्षे सेवा बजावली होती. तसेच ते जनता विद्यामंदीर त्रिंबकचे माजी संचालकही होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे, चुलत भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे. चिंदर पोलीस पाटील दिनेश पाताडे यांचे ते काका होत. त्यांच्या निधनाने चिंदर गावामध्ये सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
प्रतिनिधी / कोकण नाऊ / आचरा