“झोळी” आणि “पोलादी बाया’या पुस्तकांना पवार गुरुजी स्मृती पुरस्कार जाहीर

सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान आणि सिंधुवैभव साहित्य समूह यांचा ” आपले बाबा 2024 ” हा साहित्य पुरस्कार डॉ कालिदास शिंदे यांच्या “झोळी” आणि “दीपा पवार” यांच्या पोलादी बाया या पुस्तकाला जाहीर करण्यात येत आहे. या पुस्तकात भिक्षेकरी नाथपंथी डवरी गोसावी आणि घिसाडी या भटक्या विमुक्त समूहांची व्यथा मांडली आहे.
सदर पुरस्कार 20 मार्च रोजी , बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या महाड पाणी सत्याग्रह दिवशी वितरित केले जातील. रोख रक्कम दहा हजार आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अशी माहिती
स्नेहा राणे सरंगले.
शुभांगी सदाशिव पवार. यांनी संस्थेच्या वतीनेदिली आहे
कणकवली (प्रतिनिधी)





