व्यक्ती सापेक्ष श्रद्धा घातकच, त्या माणसाचे नुकसानच करतात .

. जिल्हा संघटक विजय चौकेकर .
वायंगणी ( वार्ताहर ) श्रद्धा या दोन प्रकारचा असतात . कालसापेक्ष श्रद्धा आणि व्यक्तीसापेक्ष श्रद्धा . आपल्याही धर्मामध्ये काही कालसापेक्ष श्रद्धा होत्या. त्या श्रद्धांमुळे मानवाचे, समाजाचे नुकसान होत होते . अशा श्रद्धा उदा . देवदासी प्रथा, सती प्रथा . त्या काळी या प्रथा श्रद्धापूर्वक आचरणात आणल्या जात होत्या, पण ज्यावेळी या श्रद्धा नसून अंधश्रद्धा असल्याचे लक्षात आले , त्या वेंळी आपल्या धर्माने आणि सर्व समाजाने या अंधश्रद्धा म्हणून नाकारल्या . मात्र व्यक्तीसापेक्ष ज्या श्रद्धा आपण आचरणात आणतो त्यामुळे मानवाचे आर्थिक , शारिरिक , मानसिक आणि लेंगिक शोषण भोंदू व्यक्ती करतात . त्यामुळे व्यक्तिसापेक्ष श्रद्धा या जीवनात घातकच आहेत . अशा भोंदू व्यक्तीवर अशी गाढ श्रद्धा ठेवण्यापूर्वी चिकित्सक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आचरणात आणावा . असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय
चौकेकर यांनी केले .
धी आचरा पिपल्स असोसिएशन मुंबई संचलित आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्ट्रडिज आचरा ता . मालवण, मुंबई विद्यापीठ संलग्रित राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत ग्रामिण निवासी शिबीर युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास अंतर्गत वायंगणी देऊळवाडी ता. मालवण, जि . सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आले होते .या शिबिरात समन्वयकांनी मुलांसाठी लोकशिक्षक उपक्रम आणि चर्चासत्राचे आयोजन केले होते . यातील एक चर्चासत्र तरुणातील अंधश्रद्धा व वैज्ञानिक दृष्टीकोन . याविषयावर विद्यार्थांना मार्गदर्शन करताता ते बोलत होते . यावेळी त्यांच्या समवेत विचार मंचावर आचरा कॉलेजचे प्राचार्य प्रा . जी टी . दळवी सर , राष्ट्रिय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक प्रा . ए . एल. कांबळी सर , प्रा . भावना मुणगेकर मॅडम , प्रा . प्रियांका हिंदळेकर मॅडम , प्रा.योगेश मुणगेकर सर, प्रा.नितेश सारंग सर, वायंगणी हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री . प्रकाश पेडणेकर सर ,
विद्यार्थी प्रतिनिधी अश्विनी सावंत , तनुजा देसाई, प्रतिक गुरव, गणेश आचरेकर , दीक्षा पाताडे , गणेश सांडव आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी विजय चौकेकर यांनी विद्यार्थ्यांचा मनातील भूत अंगात येणे ,देवी अंगात येणे, भानामती होणे, करणी करणे, मूठ मारणे, मंत्राने साप विंचूचे विष उतरविणे,मंत्राने आजार बरे करणे, जादूटोणा ,अघोरी, अनिष्ठ प्रथा, गुप्तधन, शुभ-अशुभ वेळ, शुभ -अशुभ दिवस , ग्रहण आदी विद्यार्थांचा मनातील अंधश्रद्धा विषयक सखोल मार्गदर्शन केले . जादूटोणा विरोधी कायदयाअंतर्गत बारा अनुसूचीचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले : महाराष्ट्र शासनाने पारित केलेला जादूटोणा विरोधी कायदा सविस्तर पणे समजावून दिला . मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याची गरज आणि महत्व समजावून दिले .
जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती सिंधुदुर्ग PIMC आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग यांचा संयुक्तपणे हे व्याख्यान आयोजित केले होते .