आनंदीबाई रावराणे महाविद्यालयामध्ये हेमंत क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

वैभववाडी महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा वार्षिक हेमंत क्रीडा महोत्सव दिनांक ४ जानेवारी ते ९ जानेवारी २०२४ या कालावधीत पार पडला. सदर क्रीडा महोत्सव महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाने आयोजित केला होता. या महोत्सवामध्ये वैयक्तिक व सांघिक अशा एकूण १३ खेळ प्रकारांचा समावेश होता. त्यमध्ये महाविद्यालयातील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सदर क्रीडा महोत्सवमध्ये वैयक्तीक क्रीडा स्पर्धा प्रकारांमध्ये गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, बुद्धिबळ, कॅरम, लांबउडी, उंचउडी, १०० व ४०० मी धावणे आणि सांघिक खेळांमध्ये हॉलीबॉल, क्रिकेट, रस्सीखेच व कब्बडी या खेळांचा समावेश होता. सदर स्पर्धेमध्ये हॉलीबॉल या क्रीडा प्रकारांमध्ये टी.वाय.बी. ए. च्या मुलांनी व एस. वाय. बी. कॉम. च्या मुलींनी विजय पटकावला तसेच रस्सीखेच मध्ये एम. एस. सी. प्रथम वर्ष व एस. वाय.बी.कॉम. च्या मुलींनी नंबर पटकावला. तर क्रिकेटमध्ये टी.वाय. बी. कॉम.च्या मुलांनी व विज्ञान विभागाच्या मुलींनी बाजी मारली व कबड्डीमध्ये मुलांमध्ये एफ. वाय. बी. कॉम व मुलींमध्ये टी .वाय. बी. एस. सी. च्या मुलींनी नंबर पटकावत बाजी मारली. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे स्थानिक समिती अध्यक्ष मा.सज्जनकाका रावराणे, विश्वस्त शरदचंद्र रावराणे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी. एस. काकडे उपस्थित होते.
या वार्षिक हेमंत युवा क्रीडा महोत्सवाचे आयोजन जिमखाना विभागाने केले होते.