हिट अँड रन कायद्याच्या विरोधात खारेपाटमधील मोटार चालक संघटनेच्या वतीने पोलिसांना निवेदन

हिट अँड रन कायद्याच्या विरोधात
खारेपाटण मधील मोटार चालक संघटनेच्या वतीने पोलिसांना निवेदन
कायदा रद्द न केल्यास २५ जानेवारी पासून स्टेरींग छोडो आंदोलन छेडणार
केंद्र सरकारच्या वतीने देशात नुकताच हीट अँड रन हा कायदा करण्यात आला असून सदर कायदाच मोटर वाहन चालक मालक यांच्या कुटुंबांना उध्वस्त करणार व देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा बिघडवणारा असून याच्या विरोधात कणकवली तालुका अंतर्गत मोटर चालक – मालक संघटना खारेपाटण चे कार्यकर्ते एकत्र येत सदर कायदा रद्द करण्याची मागणी करत या कायद्याचा निषेध सर्वाच्या वतीने आयोजित निशेध करण्यात आला.
याबाबतचे लेखी निवेदन नुकतेच खारेपाटण येथील पोलीस दूरशेत्र चेक पोस्ट खारेपाटण चे अमंलदार श्री उद्धव साबळे पोलीस कॉन्स्टेबल पराग मोहिते यांना देण्यात आले.यावेळी खारेपाटण टेम्पो चालक मालक संघटनेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पोलिसांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,हीट अँड रन कायदा हा आम्हाला अमान्य असून आमच्या कडून होत असलेला अपघात हा जाणून बाजून केलेला तो अपराध नाही. चालक मालक बांधव हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून यामुळे वाहन चालकांच्या मुळासकट जीवावर बेतणारा हा कायदा असून यामुळे मोटर चालक मालक यांची कुटुंबे ही उध्वस्त होणार आहेत. हा कायदा तातडीने रद्द करण्यात यावा. तसेच आमचे काही चालक बंधू अजूनही रस्त्यावर वाहने चालवीत आहेत त्यांना दी.१२ जानेवारी २०२४ पासून योग्य ती समज देणार आहोत. असे देखील निवेदनात म्हंटले आहे.
तसेच या कायद्याचा निषेध म्हणून खारेपाटण टाकेवाडी ते खारेपाटण चेकपोस्ट अशी निषेध रॅली कणकवली तालुका मोटर चालक मालक संघटना खारेपाटण च्या वतीने काढण्यात येणार असल्याचे देखील संघटनेच्या वतीने साग्ण्यात आले.याबाबतचे लेखी निवेदन कणकवली तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना देण्यात आले आहे.मात्र अशा प्रकारच्या निषेध रॅली ला पोलिसांनी परवानगी दिली नाही. मात्र हा कायदा जर का रद्द करण्यात आला नाही तर खारेपाटण मधील सर्व मोटर चालक मालक तथा ड्रायव्हर दि.२५ जानेवारी २०२४ पासून “स्टेरिंग छोडो ” आंदोलन करून आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती देखील लेखी निेवेदनाद्वारे खारेपाटण येथील मोटर चालकांनी पोलिसांना दिली आहे.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण