इंडियन आयडॉल च्या कलाकारांच्या कणकवलीतील ऑर्केस्ट्राची जय्यत तयारी

कणकवलीत भव्य व्यासपीठाची उभारणी

नगराध्यक्ष समीर नलावडेंकडून आढावा

कणकवली : कणकवली शहरात उद्या १९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या इंडियन आयडॉल मधील कलाकारांच्या ऑर्केस्ट्रा करिता कणकवली भाजपा कार्यालयासमोर कणकवली पर्यटन महोत्सव झाला त्या ठिकाणी या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, राजू गवाणकर, बंडू गांगण, आबा माणगावकर, संतोष काकडे, संदीप राणे, मयूर धुमाळे आदी उपस्थित होते. इंडियन आयडॉल च्या कलाकारांचा धमाकेदार ऑर्केस्ट्रा या ठिकाणी सायंकाळी 7 वाजता होणार असून, याकरिता भव्य व्यासपीठाची उभारणी करण्यात आली आहे. यासोबत केंद्रीय मध्यम, लघु व सूक्ष्म मंत्रालयाच्या वतीने परिसंवाद व उद्योगांबाबत मार्गदर्शन व प्रदर्शन देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून आई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा चे बक्षीस वितरण देखील या ठिकाणी केले जाणार आहे. या संपूर्ण नियोजनाचा आढावा नगराध्यक्ष श्री. समीर नलावडे यांनी घेतला.

दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!