रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत भाजपची ऑनरेकॉर्ड मते 7 लाखाच्या वर

म्हणूनच खासदार भाजपचा हवा ही जनता आणि कार्यकर्त्यांची भावना

आमदार नितेश राणे यांनी मांडली भूमिका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत १३ खासदार आलेत. त्या सर्व 13 जागा शिवसेना लढवणारच मात्र सिंधुदुर्ग रत्नागिरी चा विद्यमान खासदार शिंदे सेनेत गेलेले नाही. त्यामुळे येथे कोणाचाही दावा नाही. ज्याची ताकत जास्त आहे. त्यालाच ती जागा मिळेल. ७ लाख मत भाजपची ऑनरेकॉर्ड आहेत. निवडणूक आयोगाकडे तुम्ही पाहू शकता. असे असताना कमळ सोडून दुसरा उमेदवार देणे हे कार्यकर्ते आणि मतदारांनाही आवडणार नाही. तरीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राणे साहेब, उदय सामंत, दीपक केसरकर आणि पार्लमेंटरी बोर्ड हे सर्वांनी ठरवून योग्य तो उमेदवार देण्याचा निर्णय घेतला तर महायुतीचा उमेदवार या ठिकाणी निश्चितपणे जिंकून येणार.मात्र खासदार हा भाजपचा हवा अशी जनता आणि कार्यकर्त्यांची भावना आहे.असे आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.
दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग ची उबाठाची जागा काँग्रेसला जाणार आहे. असे सांगताना आमदार नितेश राणे यांनी 10 जनपथ करून काँग्रेसचा मातोश्रीवर निरोप आलेला आहे असे सांगितले.खासदार अरविंद सावंत यांची दक्षिण मुंबईची जागा मिलिंद देवरा यांचेसाठी काँग्रेसला द्या किंवा विनायक राऊत यांची रत्नागिरी सिंधुदुर्ग ची जागा काँग्रेसला द्या. या दोन जागा वर चर्चा सुरू आहे.कोणतीही एक जागा काँग्रेसला हवीच आहे.अरविंद सावंत आपली जागा सोडण्यास तयार नाहीत.त्यामुळे विनायक राऊत यांना ही जागा काँग्रेसला द्यावी लागणार आहे आणि कायमचे कलिनाला राहायला जाणार आहेत .असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!