भाजपा युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर

युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्याकडून विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
भाजपा सिंधुदुर्ग जिल्ह्याची युवा मोर्चा ची जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी ही कार्यकारणी जाहीर केली असून, तालुका निहाय नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीस जावेद हुसेन खतिब बांदा, सौरभ ताम्हणकर मालवण, संतोष प्रकाश पुजारे कणकवली, उपाध्यक्ष भास्कर उर्फ (संदेश) विरेश नाईक, प्रसाद कृष्णा पाटकर वेंगुर्ले, राकेश अशोक सावंत मालवण, हुसेन बादशहा लांजेकर वैभववाडी,चांदणी शरद कांबळी कुडाळ, भुषण आंगचेकर वेंगुर्ले, चिटणीस देवेंद्र रामकृष्ण शेटकर दोडामार्ग, गणेश मंगेश तळगांवकर कणकवली, चेतन राजन ढवळ कुडाळ, यश सुभाष रानडे देवगड, मंगेश विजय पारकर देवगड, रोहन जयेंद्र रावराणे, संभाजी अरविंद रावराणे, सान्वी भरत गावडे कणकवली, संग्राम सुधिर साळसकर मालवण,
सोशल मिडीया संयोजक मंदार सुहास पडवळ कुडाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी दिली.
दिगंबर वालावलकर/ कणकवली