पोईप संस्थेमध्ये आपले सरकार (CSC)योजना केंद्राचा शुभारंभ

मालवण तालुक्यातील विविध सहकारी सेवा सोसायटी मध्ये पहिले आपले सरकार केंद्र (CSC)सुरू
शासनमान्यता असलेल्या विविध ऑनलाईन योजना असलेले आपले सरकार योजना (CSC) केंद्राचा शुभारंभ मालवण तालुक्यातील पोईप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि पोईप या संस्थेत करण्यात आला
यावेळी प्रथमच सुरू झालेल्या पोईप विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या आपले सरकार योजना केंद्राचे फित कापून उद्घाटन मालवण सहाय्यक निबंधक अधिकारी ऄ.एल.हिर्लेकर यांच्या हस्ते झाले यावेळी यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे चेअरमन विठ्ठल नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच इतर मान्यवर यांचेही स्वागत करण्यात आले
यावेळी मालवण तालुक्यात 14 संस्था ना हे आपले सरकार योजना केंद्र मंजूर आहे पण आज पहिला मान पोईप संस्थेने घेतला आहे या संस्थेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे या आपले सरकार केंद्रामध्ये 151 ऑनलाईन सुविधा आहेत . या सुविधाचा येथील सभासद व ग्रामस्थ यांनी अवश्य लाभ घ्यावा आणि या संस्थेला सहकार्य करावे
संस्थेने प्रथम आपले सरकार योजना केंद्र सुरू करून मान राखला आहे
सर्व संस्थांमध्ये आपले सरकार (CSC) सेंटर केंद्र सुरू करण्याचा केंद्र सरकारचा योजना आहे .
तरी मालवण तालुक्यातील प्रथम CSC सुरू करणारी पोईप विविध कार्यकारी सहकारी संस्था आहे असे गौरवोद्गार श्री ऄ एल हिर्लेकर यानी या कार्यक्रमावेळी काढले
त्यावेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित ऄ एल हिर्लेकर संस्थेचे चेअरमन विठ्ठल नाईक, व्हाईसचेअरमन राजेंद्र पालव, संस्था संचालक संतोष हिवाळेकर, दिगंबर माधव,पंकज वर्दम, विलास सांडव,मधु कोकरे,सौ रविना पोईपकर पोईप संस्थेचे गटसचिव व्हि.आर परब
पोईप ग्रामपंचायत सरपंच श्रीधर नाईक, तंटामुक्ती अध्यक्ष दत्ताराम पालव, परशुराम नाईक, माजी चेअरमन शंकर पालव , माजी सरपंच शिवरामपंत पालव , , रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, तसेच सर्व संस्थेचे गटसचिव व सचिव, सेल्समन व्दारकानाथ पालव, आमडस्कर व सभासद, ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते
यावेळी यांचा पोईप संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच इतर मान्यवर यांचेही स्वागत करण्यात आले.
संतोष हिवाळेकर, पोईप