महावितरण च्या ॲप मध्ये त्रुटी असल्याने ग्राहकांना मनस्ताप!

महिन्याभरापूर्वी लक्ष वेधून सुद्धा त्रुटींची दुरुस्ती नाही

ग्राहकाला विज बिल भरण्याचा पर्याय देणारे महावितरण आता तरी लक्ष देणार का?

महावितरण कडून वीज बिल भरणा करण्याकरता महावितरण ॲप ची निर्मिती करण्यात आली. गेले काही महिने या ॲप मधून बिल भरण्यासाठी विविध अडचणी येत असताना याबाबत कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान हेच बिल अन्य पर्यायांचा वापर करून भरणा केल्यास ते लगेच पेड होते. यात जास्त करून वापर होत असणाऱ्या गुगल पे वरून देखील महावितरणचे बिल सहज रित्या भरले जाते. मात्र महावितरण ने निर्माण केलेला स्वतःचा हक्काचा ॲप मात्र गेले काही दिवस कार्यान्वित असून देखील अडचणीच्या फेऱ्यात सापडला आहे. याबाबत महावितरणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांचे देखील लक्ष वेधण्याचा आले होते. मात्र महिन्याभरापूर्वी लक्ष वेधून देखील या ॲपच्या समस्यांमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे महावितरण च्या ॲपद्वारे होणाऱ्या वीज बिल वसुलीला, सुद्धा याचा फटका बसत आहे. दरम्यान याबाबत महावितरण लक्ष देणार का? असा सवाल ग्राहकांमधून उपस्थित केला जात आहे.

दिगंबर वालावलकर, कणकवली

error: Content is protected !!