साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थेची वेंगुर्ले तालुका “दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्रासाठी” विविध पदाधिकाऱ्यांची निवड

साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थेच्या विश्वस्तांची सर्वसाधारण सभा संस्थेच्या भटवाडी,वेंगुर्ला येथील मुख्य कार्यालयात संपन्न झाली.यावेळी मालवण तालुक्यातील संस्थेचे सहसचिव श्री उमेश हडकर,कुडाळ तालुक्यातील संस्थेचे खजिनदार श्री सतीश भांडारकर,वेंगुर्ला तालुक्यातून सदस्य श्री दीपक पाटील,श्रीम ज्योती मडकाईकर आणि संस्थापक,अध्यक्षा श्रीम रूपाली पाटील उपस्थित होत्या. या सर्व विश्वास्तांच्या सभेतून वेंगुर्ले तालुक्यासाठी पुढील पदाधिकाऱ्यांची एकमतांनी निवड करण्यात आली.या कार्यकारणी मधील पदाधिकारी पुढील प्रमाणे,
१) श्रीम.रूपाली दीपक पाटील अध्यक्ष,वेंगुर्ला
२) श्रीम.अस्मिना रमझान मकानदार, उपाध्यक्ष,वेंगुर्ला
३) श्रीमती प्रणिता भालचंद्र पेंडसे, सचिव, वजराठ
४) श्रीम.शिवानी शिवराम आरोलकर सहसचिव,मठ
५) श्रीम.स्मिता सुनील गावडे, खजिनदार, वेंगुर्ला
६) श्रीम. छाया सिताराम कोचरे संघटक,वेंगुर्ला
७) श्रीम. ज्योती दिपक मडकईकर, सदस्य, वेंगुर्ला
साहस संस्थेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन.

प्रतिनिधी, वेंगुर्ला

error: Content is protected !!