युवासेना आयोजित कनेडी येथील नेत्र तपासणी शिबिरात 147 जणांची तपासणी

या शिबिरातील 46 जणांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया
जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, बाळा भिसे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन
युवासेनेच्या माध्यमातून कणकवली विधानसभा मतदार संघात ठीक ठिकाणी युवासेनेच्या मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांचा झंझावात सुरु असताना आज कनेडी प्रथमिक आरोग्य केंद्र येथे 5 वे शिबीर संपन्न झाले. यावेळी कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक बाळा भिसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी सतीश सावंत व सुशांत नाईक यांनी शिबिराच्या लाभार्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी या शिबिरातून मोतिबिंदू मिळणाऱ्या रुग्णांची शस्त्रक्रिया ही युवासेनाच्या माध्यमातून लवकरच करण्यात येईल असे आश्वासन दिले. या शिबिरात 147 रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्यातून 46 रुग्णांना मोतीबिंदू आढळून आले असून त्यावर शस्त्रक्रिया लवकरच करण्यात येणार आहे.
यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख मुकेश सावंत,हरकुळ बुद्रुक सरपंच आनंद ठाकूर, युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके, बेनी डिसोजा, हुसेन नाईक,कुणाल सावंत, सुदर्शन तावडे, शिवडावं सरपंच नितेश भिसे, मंगेश सावंत, दिनेश वाळके, गुरु पेडणेकर, बेटा सावंत, जोसेफ डिसोजा,आप्पा तावडे, योगेश वाळके, संजय सावंत, तुषार गावकर, संदीप गावकर, संदेश गुरव, अंजली सापळे, आरती सावंत, लवू पवार, विजय गावकर, बाळू गावकर, सुधाकर जाधव, हेमंत सावंत, कमलेश नारकर, अमेय ठाकूर, उद्धव पारकर, गणेश शिवडावकर, राजू डोंगरे, शेखर सावंत आदी शिवसेना युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते.
कणकवली, प्रतिनिधी