वझरे-दोडामार्ग येथील राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत विजेती

गोवा आणि महाराष्ट्र या राज्यतून २५ स्पर्धक सहभागी
प्रतिनिधी । कुडाळ : वावळेश्वर कला क्रीडा मंडळ वझरे गावठणवाडी (ता दोडामार्ग) आयोजित महाराष्ट्र गोवा राज्य मर्यादित आंतरराज्य भव्य एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळी कुडाळची मृणाल सावंत विजेती ठरली दोन्ही राज्यातून 25 स्पर्धक सहभागी झाले होते.
वावळेश्वर कला क्रीडा मंडळ वझरे गावठणवाडी आयोजित महाराष्ट्र गोवा राज्य मर्यादित आंतरराज्य भव्य एकेरी नृत्य स्पर्धेचे उद्घाटन गोवा डिचोली येथील डॉ चंद्रकांत शेख यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी उबाठा शिवसेना तालुका प्रमुख संजय गवस, सामाजिक कार्यकर्ते गुरुदास पेडणेकर, लक्ष्मण आयनोडकर, विजय गवस, फटी गवस, श्रीकांत गवस, उल्हास गवस, सोमा खोत, सहदेव कुडचिकर, फोंडू गवस, नारायण शिरोडकर, विठोबा शिरोडकर, माजी सरपंच लक्ष्मण गवस, समीर म्हापसकर, परीक्षक डान्स प्लस सिझन 2 चे शुभम सातोसकर, अविनाश पाल्येकर गोवा आदी मान्यवर रसिक स्पर्धक आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक मृणाल सावंत, दृतिय निकिता केलगिरी सावर्डे गोवा, तृतीय नेहा जाधव इन्सुली, उत्तेजनार्थ आस्था देवदास मडगाव गोवा, अरूनिका सांगेलकर परवोरीम गोवा यांनी मिळविला. विजेत्यांना अनुक्रमें रू दहा हजार, रु सात हजार, रु पाच हजार भव्य चषक देऊन गौरविण्यात आले बक्षीस वितरण प्रसंगी वझरे सोसायटीचे विठोबा शिरोडकर समीर म्हापस्कर लक्ष्मण गवस वासंती सावंत अर्चना गुरव नारायण शिरोडकर शुभम सावंत गणेश गवस ,प्रदिप गवस, समीर गवस, दुर्गेश आंबडकर, संजय गवस, सुंदर गवस, शुभम गवस, सत्वशील आंबडकर, प्रीतम गवस, योगेश गवस, निखिल गवस, आकाश गवस, सगुण गवस, प्रमोद तिर्डिकर, अजित घाडी, बाप्पा बांदेकर, संदेश गुरव, गजेंद्र सुतार, यशवंत गुरव, अर्जुन गुरव, दीपक गुरव, बुधाजी म्हावसकर, मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.. निवेदन भूषण सावंत यांनी केले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.