चिंदर येथील ग्रामदैवता़ची डाळपस्वारी १९ पासून

आचरा–अर्जुन बापर्डेकर चिंदर गावची ग्रामदैवतांची डाळपस्वारी मंगळवार १९डिसेंबर पासून सुरु होत आहे देवदिपावली दिवशी रवळनाथ मंदिरात मांडणी आणि गावरहाटीचा कौल घेऊन बारापाच मानकरी देवाच्या हुकूमाने डाळपस्वारीची तारीख ठरवतात.मंगळवगर १९डिसेंबर ला सायंकाळी रवळनाथ मंदिर येथून बाहेर पडून गावठणवाडी यथे भाविकांना दर्शन देत आकारी ब्राह्मण येथे पहिल्या दिवशी वस्तीला राहणार. दुसरया दिवशी आकारी ब्राह्मण येथून निघून चिंदर बाजार मार्गे पारंपारीक वाटेने अपराजवाडी गणेश मंदिर येथे भेट देणार दर तीन वर्षानी होणारी भेट भाविकांसाठी उत्साहाची ठरणार आहे. त्यानंतर दुपारी गणेश मंदिर येथे महाप्रसादानंतर सायंकाळी पावणाई मंदिर येथे तीन रात्री साठी मुक्कामाला थांबणार आहेत. तीन दिवसा नंतर पावणाई मंदिर येथून निघून कुंभार वाडी मार्गे रामेश्वर मंदिर येथे थांबणार आहेत. दत्त जयंती दिवशी माऊलीच्या जत्रोत्सवाला रात्रौ मोठ्या दिमाखात ग्रामदैवतांची स्वारी भगवती माऊली मंदिरात येते. डाळपस्वारीचा पहिल्या टप्प्यातील कार्यक्रम इथे विसावतो.तीन महिने थांबून होळीच्या सुमारे आठ दिवस अगोदर ग्रामदैवतांची स्वारी पुन्हा डाळपस्वारीला माऊली मंदिरातून बाहेर पडते.यावेळी चिंदर सडेवाडी वरुन तेरई ब्राह्मण येथे मुक्कामाला विसावते.त्यानंतरभगवंतगड किल्ला,लब्देवाडी,पालकरवाडी गांगेश्वर मंदिर येथे दोन दिवस मुक्कामाला थांबते.यानंतर गावडेपुरुष मंदिर भेट देते सातेरि मंदिर यथे येऊन चिंदर गावची डाळपस्वारी होळीच्या आदल्या दिवशी पुर्ण होते.