आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले

आचरा येथील नाभिक बांधवांची अणाव येथील अनाथ आश्रमात सेवा
वृद्धांचे केली केस दाढी करून सेवा
आचरा–अर्जुन बापर्डेकर आपण समाजाचे काही देणं लागतो.याऋणातून काही प्रमाणात का होईना उत्तराई व्हावे वृद्धांची सेवा करावी या भावनेतूनच आचरा येथील नाभिक बांधवांनी अणाव येथील वृद्धाश्रमात सोमवारी भेट देत तेथील वृद्धांची मोफत केस दाढी करुन सेवा करत समाजासमोर एक आदर्श ठेवला.
बालगोपाळ मंडळाच्या युवकांच्या यासेवेने वृद्धांचे हास्य मात्र पुन्हा फुलले.
अणाव येथील आनंदाश्रय आश्रमातील वृद्ध पुरुष /महिला यांची आचरा येथील श्री बाळगोपाळ मंडळातील नाभिक बांधव यांच्या कडून केस दाढी करून सेवा करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर यांच्या संकल्पनेतून आणि स्वतः पुढाकार घेऊन मंडळातील नाभिक बांधव विलास आचरेकर,मंदार आचरेकर,संदीप चव्हाण,आनंद आचरेकर,महेंद्र आचरेकर,ओमकार आचरेकर,भूषण शेट्ये,यतीन आचरेकर,किरण,आचरेकर यांना घेऊन त्यांनी ही सेवा केली. त्यांनी केलेल्या या आगळ्या सेवेबद्दल आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष गोविंद परब यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.