तत्त्वज्ञानाच्या गोष्टी करणाऱ्या दिलीप घाडीगावकर यांच्या मुलाचा वागदेत पराभव का झाला?

शिशिर परुळेकरांमुळेच तुमचे तालुकाध्यक्ष त्यावेळी झाले होते नगरसेवक
आम्हाला प्रमोद जठार हेच खासदार म्हणून उमेदवार हवेत ही भाजपा कार्यकर्त्यांची इच्छा
भाजपा तालुका कार्यकारणी माजी सदस्य स्वप्निल गोसावी यांचा टोला
कणकवली चे माजी नगरसेवक शिशिर परुळेकर हे आमचे सन्माननीय नेते आहेत. गेली 25 वर्ष होऊन अधिक काळ राजकारणात असलेले तसेच दोन वेळा भाजपा तालुकाध्यक्ष, संजय गांधी कमिटीचे अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे सांभाळून पक्षाशी कठीण काळात एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते आहेत. आजही त्यांना कणकवली तालुक्यात मानणारा वर्ग आहे. याची आदी दिलीप घाडीगावकर यांनी माहिती घ्यावी उगाच कोणाच्या तरी सांगण्यावरून नाहक टीका करू नये. असा टोला भाजपा कार्यकारणीची माजी सदस्य स्वप्निल गोसावी यांनी लगावला आहे.
सन 2013 सालात आमचे नेते नारायण राणे आणि आताचे उबाठा सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर एकत्र असताना माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या विरोधात त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यावरून निवडणूक लढवली होती. आणि सन्मान जनक खिलाडू वृत्तीने पराभव स्वीकारला होता. याचीही माहिती दिलीप घाडीगावकर यांनी घ्यावी.
याउलट तुमचे तालुकाप्रमुख 2008 सालात कोणाच्या कृपेमुळे नगरसेवक झाले होते याचीही माहिती घ्यावी.
दिलीप घाडीगावकर हे कुडाळ मालवणी विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्याकडे उदरनिर्वाहास होते. त्यांच्याबरोबर तुमचे असे काय संबंध बिघडले म्हणून तुम्ही पक्षांतराचा निर्णय घेतला तरी स्पष्ट करा?.
दिलीप घाडीगांवकर यांनी आपल्या सुपुत्राचा वागदे गावात साध्या छोट्या वार्डात ग्रामपंचायत सदस्य म्हणून पराभव का झाला ? .माजी आमदार प्रमोद जठार हे आमचे नेते आहेत. फक्त शिशिर परुळेकरच नव्हे तर भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत. त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न हे करणारच.
कणकवली तालुक्यात मोजून 16 कार्यकर्ते असलेल्या पक्षाने आम्हाला अकलेचे तारे तोडून दाखवू नयेत.
उगाच काहीतरी खोटे प्रवेश घेऊन त्याची कात्रणे पाली येथे पाठवून शाबासकी मिळवण्याचा प्रयत्न आता थांबवावे.. केव्हातरी याचा फुगा सामंत बंधूंकडे नक्कीच फुटेल..
दिलीप घाडीगांवकर हे शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत. परंतु तुम्ही जास्तीत जास्त वेळ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसमवेत असता. त्यामुळे ओल्या पार्ट्या, दारूण पराभव हे सगळे शब्द तुम्हाला किती लागू पडतात हे आम्हाला सर्व न्यात .आहे.
यापुढे वायफळ बडबड केल्यास आपल्या जिल्ह्यातील नेत्यांपासून तालुक्यातील नेत्यांपर्यंत च्या ओल्या पार्ट्या, छम छम खेळ.. आणि इतर सर्व डाटा तुमच्या वरिष्ठ नेत्यांकडे पोस्ट करायला आमचा कार्यकर्ता मागे राहणार नाही. असा इशारा माजी तालुका कार्यकारणी सदस्य
कळसूली चे स्वप्निल गोसावी यांनी दिला आहे.
कणकवली प्रतिनिधी