आचरा येथील केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन संपन्न

आचरा–अर्जुन बापर्डेकर आचरे केंद्र स्तरीय बाल कलाक्रीडा व ज्ञानी मी होणार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन सरपंच जेरान फर्नांडिस यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी केंद्र प्रमुख सुगंधा गुरव,उपसरपंच संतोष मिराशी, जयप्रकाश परुळेकर, आचरा हायस्कूल मुख्याध्यापक गोपाळ परब,शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक,मातापालक संघ, मुख्याध्यापक, शिक्षक,सर्व शाळांचे विद्यार्थी आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी जेरान फर्नांडिस, राजन गांवकर, संतोष बेकरी,जयप्रकाश परुळेकर, संदीप पांगम,आरोग्य विभाग, आचरा हायस्कूल, आदींचे विशेष योगदान लाभले .प्रास्ताविक केंद्र प्रमुख सुगंधा गुरव यांनी केले तर आभार श्रीमती मांजरेकर यांनी मानले.