तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कुंभवडे शंकर महादेव विद्यालयाचे यश

विविध स्तरावर विद्यार्थ्यांची पुढील स्पर्धेसाठी निवड
संस्थाचालकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक
५१वे कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे तालुका कणकवली येथे दिनांक १२ व १३ डिसेंबर रोजी पार पडले या विज्ञान प्रदर्शनामध्ये शंकर महादेव विद्यालय कुंभवडे या आपल्या प्रशालेतून प्राथमिक विद्यार्थी प्रतिकृती व माध्यमिक विद्यार्थी प्रतिकृती या दोन्ही गटांमध्ये सहभाग नोंदवला होता तसेच वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व प्रश्नमंजुषा या तिन्ही स्पर्धांमध्ये प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये विद्यार्थी प्रतिकृती प्राथमिक विभागामध्ये टू इन वन सिंपल मशीन हे साधन कु. भक्ती अनंत सावंत व कु.राज दीपक पांचाळ यांनी सादर केले तर माध्यमिक विभागात बहुउपयोगी यंत्र हे साधन कु.भावना अनंत सावंत व कु.सरिता सुनील सावंत यांनी सादर केले.दोन्ही प्रतिकृतींना प्रशालेचे विज्ञान विषय शिक्षक श्री सहदेव दिनकर पालव सरांनी मार्गदर्शन केले. परीक्षणाअंती माध्यमिक गटातून बहुउपयोगी यंत्राचा प्रथम क्रमांक आला असून या प्रतिकृतीची निवड जिल्हास्तरावर झालेली आहे तसेच प्राथमिक गटातील टू इन वन सिंपल मशीन या प्रतिकृतीचा तिसरा क्रमांक आला असून या प्रतिकृतीची पण जिल्हास्तरावर निवड झालेली आहे. सदरच्या माध्यमिक व प्राथमिक गटातील चारही सहभागी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री सहदेव पालव सरांचे शालेय समितीचे अध्यक्ष ॲड.श्री राजेंद्र रावराणे साहेब आणि संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अपूर्वा दीपक सावंत मॅडम यांनी सर्व सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले व जिल्हा स्तरासाठी शुभेच्छा दिल्या.शंकर महादेव विद्यालय कुंभवडे, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील सहभागी विद्यार्थी व पालव सरांचे अभिनंदन केले.
कणकवली प्रतिनिधी