अभिताज भाबल दुःखद निधन

आचरा आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अभिताज रमेशचंद्र भाबल वय 47 रा तांबळडेग देवगड यांचे मंगळवारी मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आकस्मिक निधन झाले. आचरा पोलीस स्टेशनला ते गेली पाच वर्षे हवालदार म्हणून कार्यरत होते. सहकार्याच्या भावनेमुळे ते सुपरिचित होते. बुधवारी सकाळी त्यांच्यावर तांबळडेग येथील स्मशानभूमीत पोलीस इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे बहिण असा परिवार आहे.