“आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा रहिवाशी संघ दिवा शहर” आयोजीत महा रक्तदान व संगीत महा जुगलबंदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.

कणकवली/मयुर ठाकूर

सदर दिवशी सकाळच्या सत्रात महारक्तदान कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. बहुसंख्य रक्तदात्यांनी स्वतः पुढे येऊन रक्तदान केले. सदर रक्तदात्यांना संघटनेच्या मार्फत प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

त्यानंतर काही वेळ विश्रांती घेऊन सायंकाळी ते रात्री संगीत महा जुगलबंदी कार्यक्रमाचे आयोजन केले होते,
सदर कार्यक्रमात सादरीकरण केले ते,
इंडियन आयडॉल फेम, गायक श्री. जगदीश चव्हाण,
मुरबाडचा बुलंद आवाज, गायक श्री. कैलास कडव,
जगविख्यात पखवाज वादक श्री. कृष्णाची साळुंखे,
नवोदित युवा तबला वादक, कु. सोहम गोराने आणि
या कार्यक्रमात निवेदक म्हणून सिंधुदुर्ग चा बुलंद आवाज श्री. राजाजी सामंत यांनी धुरा सांभाळली.

दिवा शहरात प्रथमच संगीत महा जुगलबंदी कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती.

सदर कार्यक्रमास बहुसंख्य दिग्गज मंडळी आणि भजनी कलावंत, दशावतारी कलावंत यांनी हजेरी लावली, कार्यक्रमास ठाणे, डोंबिवली, कल्याण तसेच मुंबई शहरातून देखील मोठ्या प्रमाणात दिग्गज मंडळी उपस्थित राहिली होती. तसेच दिवा शहरातील दिग्गज नेते मंडळींनी सुद्धा कार्यक्रमास हजेरी लावली.

संघटने मार्फत उपस्थीत दिग्गज मंडळी, मान्यवर, संघटनेचे सभासद तसेच प्रतिष्ठीत व्यक्ती, नेते मंडळी यांचा मानसन्मान देखील करण्यात आला.

शहरातील नेते मंडळी तसेच उपस्थित दिग्गज मंडळी तसेच नागरिकांचे “आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी संघ दिवा शहर” या संघटने मार्फत आभार मानण्यात आले.

अध्यक्ष – बंसिधर सावंत
उपाध्यक्ष – अविनाश पाटील
कार्याध्यक्ष – उमेश घोगळे
सचिव – रामकृष्ण सावंत
उपसचिव – महेश पारकर
खजिनदार – समिर सावंत
उप खजिनदार – महेश सावंत
सदस्य – सचिन घाडीगांवकर
सदस्य – कमलेश सुतार
सल्लागार – विजय सावंत, कांचन मांजरेकर, प्रशांत कदम, किरण लाड, गितेश परब, विनोद शिंदे, आनंद सावंत, प्रथमेश घाडीगांवकर आणि वैभव जाधव.

आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा रहिवाशी संघ दिवा शहर
रजि. महा/२१६/२०२३

error: Content is protected !!