स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमाच्या नियोजनसाठी आज सायंकाळी बैठक

कणकवली पर्यटन महोत्सवाचे निमित्त
आमदार नितेश राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणी माजी नगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या संकल्पनेतून 11 ते 14 जानेवारी 2024 या कालावधी कणकवली पर्यटन महोत्सव आयोजन केले आहे. यामध्ये दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी 200 स्थानिक कलाकारांच्या संचात तीन तासाचा स्टेज शो होणार आहे यामध्ये नृत्य ,गायन ,अभिनय, मिमिक्री ,नाट्य, विनोदीअभिनय, असे विविध कार्यक्रम होणार आहेत. ज्या स्थानिक कलावंतांना या कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी आज 13/ 12/ 2023 रोजी संध्याकाळी 7 वाजता नगर
वाचनालय हॉल कणकवली येथे उपस्थित रहावे असे आवाहन सुहास वरूणकर व प्रा.हरिभाऊ भिसे यांनी केले आहे.
कणकवली प्रतिनिधी